Monday, March 7, 2016

Sunil Khobragade च्या बलिदानामुळे संघटीतरित्या व्यक्त होणारा आक्रोश कितीही मोठा असला तरी या आक्रोशयुक्त प्रतीक्रीयावादाने मूळ समस्या सुटण्याची शक्यता नव्हती.मात्र हा आक्रोश दाबून टाकण्यासाठी संघीष्टानी देशद्रोहाच्या नावाने दडपशाहीचे तंत्र वापरले. त्यातून मुलभूत लोकशाही,मुलभूत संवैधानिक हक्क,कायद्याचे राज्य या राष्ट्रस्थैर्यासाठी अनिवार्य असलेल्या प्राथमिक बाबींना धोका निर्माण झाल्याची जाणीव देशातील सर्वसामान्य विवेकशील जनतेला आणि मध्यमवर्गीय बुद्धीजीवी वर्गाला झाली. हा वर्ग आतापर्यंत रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येच्या मुद्द्याकडे केवळ दलित भेदभावाचा मुद्दा म्हणून अलिप्तपणे पाहत होता. मात्र कन्हैय्या कुमार व जेएनयुतील अन्य विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या बनावट आरोपाखाली अटक करण्यात आल्याने विद्यापीठीय वर्तुळात अभ्यास व संशोधन करून प्रमेये मांडणारे प्राध्यापक, दलित,आदिवासी,ओबीसी,मुस्लिम,ख्रिस्चन या बहुजन वर्गातील वेगवेगळ्या विचारधारेशी बांधिलकी मानणारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी व पिएचडी करणारे शोधार्थी ( Scholar ) मुले-मुली या सर्वांची विधायक एकजूट घडून आली आहे.या विधायक एकजुटीचा चेहरा कन्हैय्या कुमार हा तरुण आहे. कन्हैय्या कुमारच्या रूपाने परिवर्तनवादी चळवळीला एक नवा नायक मिळाला आहे.या नायकाने जातीच्या,राजकीय विचारधारेच्या सीमांना तूर्त तरी छेद दिला आहे. हे पाहता कन्हैय्या कुमारला भूमिहार जातीचा म्हणून,डाव्या विचाराचा/पक्षाचा समर्थक म्हणून एका वर्तुळात बंदिस्त करणे घाईचे ठरेल.


च्या बलिदानामुळे संघटीतरित्या व्यक्त होणारा आक्रोश कितीही मोठा असला तरी या आक्रोशयुक्त प्रतीक्रीयावादाने मूळ समस्या सुटण्याची शक्यता नव्हती.मात्र हा आक्रोश दाबून टाकण्यासाठी संघीष्टानी देशद्रोहाच्या नावाने दडपशाहीचे तंत्र वापरले. त्यातून मुलभूत लोकशाही,मुलभूत संवैधानिक हक्क,कायद्याचे राज्य या राष्ट्रस्थैर्यासाठी अनिवार्य असलेल्या प्राथमिक बाबींना धोका निर्माण झाल्याची जाणीव देशातील सर्वसामान्य विवेकशील जनतेला आणि मध्यमवर्गीय बुद्धीजीवी वर्गाला झाली. हा वर्ग आतापर्यंत रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येच्या मुद्द्याकडे केवळ दलित भेदभावाचा मुद्दा म्हणून अलिप्तपणे पाहत होता. मात्र कन्हैय्या कुमार व जेएनयुतील अन्य विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या बनावट आरोपाखाली अटक करण्यात आल्याने विद्यापीठीय वर्तुळात अभ्यास व संशोधन करून प्रमेये मांडणारे प्राध्यापक, दलित,आदिवासी,ओबीसी,मुस्लिम,ख्रिस्चन या बहुजन वर्गातील वेगवेगळ्या विचारधारेशी बांधिलकी मानणारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी व पिएचडी करणारे शोधार्थी ( Scholar ) मुले-मुली या सर्वांची विधायक एकजूट घडून आली आहे.या विधायक एकजुटीचा चेहरा कन्हैय्या कुमार हा तरुण आहे. कन्हैय्या कुमारच्या रूपाने परिवर्तनवादी चळवळीला एक नवा नायक मिळाला आहे.या नायकाने जातीच्या,राजकीय विचारधारेच्या सीमांना तूर्त तरी छेद दिला आहे. हे पाहता कन्हैय्या कुमारला भूमिहार जातीचा म्हणून,डाव्या विचाराचा/पक्षाचा समर्थक म्हणून एका वर्तुळात बंदिस्त करणे घाईचे ठरेल.

No comments:

Post a Comment