बुद्ध मूर्तीच्या शिरावर असलेली प्रतिक रुपी चुडी अगदी जशीच्या तशीच शिवमूर्ती तयार करताना वापरली आहे. पदमासणातील बुद्ध आणि शिवाच्या पदमाआसनातील मूर्ती सुध्या साम्य दर्शकच आहे. एवढेच नव्हे तर बुद्धाचे चीवर लक्षात घेत तयार केल्या मुर्त्यावरून शिवाच्या अंगावर जे वस्त्र चढवले आहे ते हि अल्प व त्याच बाजूने शरीर झाकणारे आहे. अर्थात या शिवाला विष प्यायला लावून त्याचे शरीर निळे झाल्याची कथा प्रस्तुत केल्यानंतर त्याला नीलकंठ केले आणि गव्हाल अथवा सुवर्णकांती असलेल्या बुद्धाला अडगळीत टाकण्याचा प्रयत्न झाला. शिवाच्या डोक्यातून गंगा उत्पन झाल्याचे रूपक हे रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचे अनुषंगाने तयार केले असल्याचे मत ३०-४० वर्षापूर्वी सिरी. चंद्रनाग यांनी नमूद केले असून शिवाचा तिसरा डोळा म्हणजे बुद्ध हे त्रिदर्शी होते याचीच उचलेगिरी केले असल्याचे मतही नोंदवले होते. अर्थात बुद्धाच्या विशेष दुष्टी बाबतची माहिती पाली त्रीपिठ्कातहि नमूद आहे. ज्यात त्यांना त्रिलोचन असे म्हटले आहे. विशेष म्हणजे "भगवान के पद से निकली हुइ गंगा तीन मार्गो से गमन करणे वाली होती है" असाही उलेख स्कंद पुराणात आहेत. आता शिवाच्या गळ्यात नाग का टाकला हे विशद करण्याची गरज नाही. कारण नाग हे नागवंशीयांचे टोटेम असल्याकारणाने जस बुद्धमूर्तीवर नागछत्राची मूर्ती आपण बुद्धगयेत बघू शेकतो. त्यानुसार शिव (सिव) च्या गळ्यात नाग अडकून नागवंशीयांना सिवमार्ग पासून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न प्रथम श्रेणीच्या चातुवर्णी बांधवानी केला असल्याचे दिसून येते. अर्थात शिव (सिव) चा मुद्दा इथेच पूर्ण होत नाही. मानवी जीवनाची आसक्ती संपुष्टात यावी म्हणजेच अनासक्त व्हावे यासाठी 'भग्गवान' आपल्या भिक्खुणा श्माशानात पाठवत असत. एवढेच नव्हे तर तिथे काही दिवस राहायला सांगून ध्यानस्त व्हायला सांगत, जेणे करून मानवी जीवनाची क्षणभंगुरता लक्षात येयील व कालांतराने अनास्क्तीचा भाव विकसनशील होवून खर्या अर्थाने त्यांना भंते ( भयाचा अंत झालेली व्यक्ती भयमुक्त लोकसेवक) होता येयील. त्यामुळे काशीला शौवधर्माचे मोठे केंद्र कोणी केले? तिथे शिववाद कोणी धृड केला त्याची नाळ सारनाथ मधील धर्मचक्रप्रवर्तनाशी व त्या प्रभावाशी आहे. शिवपुराणात तर शिवाला भिक्शुवर्य असे सुद्धा म्हटले आहे. त्यामुळे आपण आज मोक्षधामात जी शिवाची प्रतिमा बघतो ती खरे तर मुळात बुद्धावर पांघरून घातलेली शिवमूर्ती आहे. कारण इतिहासाचा विचार करता शिव हे पात्र पुराणकथा गौरवांकित केल्यानंतर त्याची मूर्ती आजच्या परावर्तीत स्वरुपात आपण बघतो. मात्र बुद्ध मूर्त्याचा उदय झाल्यानंतरच शिवप्रतिमेची स्पष्ट कल्पना आपणाला होते. आणि त्यामुळे आणि तात्विक मुद्याचा विचार करता भिक्खू आणि भिक्खू वर्य 'भग्गवान' यावर मत करण्यासाठी झालेला शिवोदय हा नागवंशीयांनी जर गंभीर रीतीने समजून घेण्याची गरज आहे. एबी ना अभिप्रेत सांस्कृतिक बहुसंख्याकवाद साध्य करण्या स्तव कोणत्या अड़तल्याना पार करून वाटचाल करायची आहे याचेही भान आहे. कारण आजचे शिवपूजक हे मुळचे सिवमार्ग पूजक झाल्याशिवाय मोक्षधामातील शिवमूर्तीच्या जागी बुद्ध मूर्तीची प्रस्थापना होणे नाही. हे लक्षात घेत आजचे शिवपूजक कुणबी,तेली,कोळी, न्हावी, माळी,आणि बहुतांश आदि जंगलनिवासी यांना त्यांच्या मुळ संस्कृतीची जान करून देणे हे सत्यावाद्यांचे अद्य कर्तव्य ठरते. कारण वर्तमानातील शिववाद हा जरी बुद्धवादाची चोरी करून उभा केलेला मामला असला तरी आजवर त्याबाबत जोराने बोंबलले गेल्यान त्याआडचा निर्वाण (सिव) वाद पूर्णता विस्मुर्तीत झाला आहे. त्या मूळ सांस्कृतिक स्मुर्तीना उजाळा देत नागवंशी कुणबी,तेली,माळी,मराठा इत्यादींनी आता कोणत्या शिवाची कस धरायची याचा निर्णय तरी घ्यावा लागेलच. शूद्रांना तोडून निर्वाशित आणि अनिर्वाशित शुद्र अशा दोन प्रकारात विभागले व कालांतराने अनिर्वाशित शूद्रांना अतिसुद्र ठरवून अस्पृश्यतेचा शिक्का मारला. अशाप्रकारे परस्परा मध्ये दुरावा निर्माण करून त्यांना दूर लोटले. त्याच खेळीचा उपयोग करून सांस्कृतिक दुष्ट्या निर्माण करण्याचे प्रक्रियेत बुद्धाप्रेमिना बुद्ध द्वेषी करण्यात यश मिळवले. अर्थात बाहेर पडू नये व शिव-पार्वती आणि नंदी गणेश छाप पुराणमतवादाचे भारतावर कायम वर्चस्व राहावे असा प्रयत्न प्रथम श्रेनीय यज्ञावांशी बांधव कशोशिने करताहेत. कारण खोट्या दम्भात जगण्याची सवयीचा संसर्ग अन्य त्रीवारीयाना झाल्यामुळे त्याच अंधार कोठडीला स्वर्ग मानण्याची चुकीची सवय लागली आहे. अशा प्रकारे अज्ञानाला आधाराला कवटाळण्याचे सवयीतून मुक्त होण्याबाबत जो उपदेश जोतीराव फुले बा नी शुद्रजनानी घेणे जरुरी ठरते. त्याशिवाय नागवंशी संस्कृती मधील खर्या नागाचे फुत्कार विषमतेच्या संस्कृतीवर प्रभावी ठरणार नाहीत. साभार सदधर्म संदेश मासिक फेबु २०12
☸☸🙏🏻🙏🏻☸☸
☸☸🙏🏻🙏🏻☸☸
No comments:
Post a Comment