Thursday, October 31, 2013

पेट्रोल स्वस्त; डिझेल महाग

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचे चांगले परिणाम तेल बाजारात दिसू लागले असून पेट्रोलच्या दरामध्ये गुरुवारी १ रुपया १५ पैशांनी कपात करण्यात आली. त्यामुळे स्थानिक कर आणि व्हॅट धरून मुंबईत पेट्रोल ७८ रुपये ०४ पैसे लिटर या दराने मिळणार आहे. डिझेल ५० पैशांनी महाग झाले असून मुंबईत ते ६० रुपये ०८ पैसे दराने मिळणार आहे.

No comments:

Post a Comment