Friday, October 3, 2014

भारतातील सर्वात मोठी बुद्ध युनिवरसिठी कोणती

भारतातील सर्वात मोठी बुद्ध युनिवरसिठी कोणती
सचिन धम्मबोधि
भारतातील सर्वात मोठी बुद्ध युनिवरसिठी कोणती, ती कुठे आहे व ती कोणी बांधली असा प्रश्न मी फेसबुक ग्रुप मध्ये केला होता. त्या पोस्ट वर आलेल्या कॉमेंट वाचून खासकरून महाराष्ट्रातील बुद्धिष्ठ म्हणवणाऱ्या बांधवांच्या बुद्धीची खरोखरच कीव करावीशी वाटली. (मी नेहमी स्पष्ठ बोलतो कारण शहाण्याला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटते)
किती अज्ञान आहे लोकांमध्ये खास करून बुद्धिष्ठ म्हणवणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील लोकांमध्ये हे या पोस्ट वर आलेल्या कॉमेंट वरून कळाले व फार दुख हि झाले. फक्त विरोध करायचा म्हणून बहन मायावती व बसपा बद्दल काहीही बोलायचे हि सवयच लागली आहे काही लोकांना. असे वाटते बरेच लोक फक्त कागदावर बुद्धिष्ठ आहेत. 
मी तुमच्या माहितीसाठी फोटो टाकत आहे. तरीही काही स्वार्थी विरोध करायचा म्हणून करतीलच पण खरे बुद्धिष्ठ हे नक्कीच अप्रेशीएठ करतील व बहन मायावती जी व बसप ला भारत बौद्धमय बनविण्यासाठी पाठींबा देतील. 
बहन मायावती जी च्या मनातील सर्वात मोठा अम्बिशिअस प्रोजेक्ट हा गौतम बुद्ध युनिवरसिठी होता जो त्यांनी २००२ साली राबवला व भारतातील सर्वात मोठी भव्य युनिवरसिठी उत्तर प्रदेश मध्ये स्थापन केली. बहन मायावती उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री झाल्यावर ५५० एकर वर भारतातील सर्वात मोठी बुद्धिष्ठ युनिवरसिठी ४ वर्षात बांधून २००८ साली सुरु केली. बहन मायावती जी च्या इच्छेनुसार हि युनिवरसिठी बुद्धिष्ठ कलाकृतीला नुसार बांधलेली आहे. या युनिवरसिठी मध्ये सर्व शाखांचे शिक्षण दिले जाते त्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे भारतातील सर्वात मोठी लायब्ररी सुद्धा आहे. जेथे २५०० विद्यार्थी एकाच वेळेस अभ्यास करू शकतात. विशेष म्हणजे महात्मा जोतीबा फुले च्या नावाने सर्वात मोठे मेडीटेशन केंद्र युनिवरसिठी मध्ये बांधणारे सुद्धा भारतातील हीच पहिली युनिवरसिठी असावी. येथे ५००० विद्यार्थी व विद्यार्थिनी राहतील असे एअर कंडीशनिंग सावित्रीमाई फुले होस्टेल हि बांधलेले आहे. 
भारतीय मेडिया बुद्ध -फुले -शाहू -आंबेडकर याच्या विचारांना नेहमीच अस्पृशाचाच दर्जा देत आली आहे. त्यामुळे हि या सर्वात मोठ्या युनिवरसिठी चा आजुनहि लोकांमध्ये प्रचार नाही. 
पण याचा प्रचार करणे हे बुद्ध -फुले -शाहू -आंबेडकर यांना माननार्यांचे हे कर्तव्य आहे. त्यामुळे बिनधास शेअर करा. भारतातील सोडा पण आपल्या महाराष्ट्रातील बुद्धिष्ठ म्हणवणाऱ्यान पर्यंत तरी पोहचावा. कारण महाराष्ट्रातील झोपेच सोंग घेतलेला बुद्धिष्ठ जर जागा झाला व बहन मायावती व बहुजन समाज पार्टी चा धागा झाला तर मानुवाद्यांची काय खैर नाही याचा मला ठाम विश्वास आहे.

No comments:

Post a Comment