Tuesday, June 18, 2013
उत्तरेतील पावसाच्या थैमानाची वृत्त टीव्हीवर पाहताना त्यातील एका वृत्ताने अधिक अस्वस्थ झालो..ऋषिकेशला गंगाकिनारी असलेल्या स्वामीनारायण मठातही पहाटे पाणी शिरलं.बचाव दलाने मठातील बाकी सगळ्यांना बाहेर काढलं,मात्र मठाधिपती बाहेर यायला तयार होईनात..मठाची सर्व संपत्ती ज्या तिजोरीत बंद होती,ती तिजोरीही आपल्याबरोबर बाहेर काढावी असा त्यांचा आग्रह होता. बचाव दलाला अर्थातच तेवढा वेळ नव्हता..शेवटी नाईलाजाने बचाव दल बाहेर पडलं आणि त्यानंतर काही क्षणातच तो मठ त्या मठाधिपतीसह गंगेत मिसळला...काय म्हणायचं साधू पुरुषांच्या या हव्यासाला..?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment