हुशार शेतकरी
हुशार शेतकरी
आम्ही शाळेत असताना ,मराठीच्या पुस्तकात एक गोष्ट होती.
हुशार शेतकरी
त्यावर्षी पावूस पडला नाही,शेतकरी हवालदिल झाले .एक शेतकरी देवाची आराधना करायला लागला.तो शेतकरी हुशार आहे हे देवाला माहित होते,पण बघूया म्हणून देव त्याचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी गेला.शेतकर्याने सांगितले पावूस्पनी नसल्यामुळे खूप हाल होत आहेत .कृपा करा आणि पावूस होऊ द्या शेतात जे येईल त्यातील अर्धे तुम्हाला देईल.'
देव म्हणाला,'ठीक आहे पावूस येईल पण जे पिक घेशील त्यातील मला वरचे पिक दे .'
शेतकरी म्हणाला ,;ठीक आहे.'
देव तथास्तु म्हणाला .
खूप पावूस पडला .शेत पिकांनी डोलू लागली .पिक कापायला आले .देव दत्त म्हणून हजर राहिला म्हणाला ,'माझा वाटा दे '
शेतकरी म्हणाला ,'देवा तुझा वाटा काढूनच ठेवला आहे.'
आणि शेतकर्याने घेतलेल्या भुईमुगाच्या शेंगांचे पिकापैकी त्याने देवाला वरचा पाला दिला आणि स्वतः भुईमुगाच्या शेंगा घेतल्या.
दुसऱ्यावर्षी परत दुष्काळ पडला .शेतकर्याने देवाला विनवले .देव म्हणाले 'पावूस पाडीन पण मला यावर्षी पिकाच्या खालचा भाग दे.'
शेतकऱ्याने कबुल केले.खूप पावूस पडला.
पिक भरपूर आले.देव पिक घ्यायला आला .शेतकर्याने देवाला जवारीच्या खालचे मुळे दिली आणि स्वतः जवारी घेतली .
तिसऱ्या वर्षी देव म्हणाला,'मला पिकाचे वरचे आणि खालचे दोन्ही भाग पाहिजेत शेतकरी कबूल झाला .
यावेळेस शेतकऱ्याने ऊस लावला.
देव शेतकऱ्यावर खुश झाला.
या हुशार शेतकऱ्यासारखे कोणी भेटल्यास नक्की कळवा .
No comments:
Post a Comment